नमस्कार मागिल भागात आपण तुतीच्या विविध जाती (वाणांची ) माहिती घेतली ... जर तुम्ही ती पोस्ट व आधीच्या पोस्ट वाचल्या असतील तर छानच .... नसतील तर नक्की वाचा ... !
बर नमनाला घडाभर तेल असं नको व्हायला 😀 म्हणुनं जो आजचा विषय आहे ,तो चालू करू .. रेशिम शेती करायची म्हणलं तर रेशिम आळी (किटक ) हवाच, रेशीम शेती करण्यासाठी एकदा रेशीम कार्यालयात नोंद केली की आपण अंडी बुक करु शकतो ,बुक केल्यानंतर साधारण १५ दिवसानी आपल्या हातात रेशीम कार्यालयातून अंडीपुंज मिळतात . ही अंडी साधारण मोहोरीच्या आकाराची असतात आणि फिक्कट करड्या रंगाची असतात .ही अंडी बुक करताना आपल्याला DFL मध्ये बुक करावी लागतात , साधारण ५० DFL मध्ये ३० हजार अंडी असतात , त्यात साधारण २ % कमी किंवा जास्त असतात .
आता DFL म्हणजे काय ते सांगतो "डिझीस फ्री लेयिंग्स (डीएफएल)" म्हणजे एक मादी मॉथने घातलेला रोग मुक्त अंडी होय. "रोग" म्हणजे रेशमाच्या किड्याचे किंवा त्याच्या काही अवयवांच्या शरीरातील स्थितीत बदल, कार्यांच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणणे किंवा अडथळा आणणे, आणि रेशीमवर्गातील कमकुवतपणा होय .
आता तुह्मी विचाराल मॉथने म्हणजे कुणी या चित्रातील Adult ने ही अंडी दिली आहेत ... ही अंडी आपल्याला मिळण्यासाठी सीड बॅच असते तो विषय आपण आता घेतला तर विषयानंतर होईल ...
ही जीवन साखळी फक्त हा विषय समजून घेण्यासाठी आहे पहा...
पतंग एक दिवस जुळत राहतात. विभक्त झाल्यानंतर मादी अंडी घालते आणि नर दुसऱ्या मादीला शोधते. प्रत्येक मादी 200 ते 500 अंडी घालते. अश्या अनेक पतंगापासून आपल्याला ही अंडीपुंज आपणास मिळतात, हे काम डेव्हलोपमेंट सेंटर करते. हे काम फार जवाबदारीचे आणि कठीण सुध्दा ......
बर आता अंडीपुंज म्हणजे काय याचा साधारण अंदाज तुम्हाला आलाच असेल , आता ती अंडी उबवून त्यातून लार्वा (छोटी अळी ) बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस ब्लॅक बॉक्सिंग असे म्हणतात, थोडक्यात अंडी उबवण्याच्या प्रक्रियेला ब्लॅक बॉक्सिंग असे म्हणतात.
ब्लॅक बॉक्सिंग तंत्र विकसनशील अंड्याना पूर्णपणे गडद(अंधारात) स्थितीत ठेवून रेशमी अळ्यांना त्याच्या कवचातून बाहेर काढण्यासाठी व अंड्यांचे एकसमान सिंक्रोनाइझ हयाचिंग सुनिश्चित करणे हा ब्लॅक बॉक्सिंग करण्यामागचा मुळ उद्देश्य आहे.
ब्रशिंग हा ब्लॅक बॉक्सिंग करून सर्व रेशीम अळ्या कवचातून बाहेर आल्यानंतर त्यांना त्याच्या कवचापासून वेगळेकरून त्यांना पहिले फिडींग देणे याला ब्रशिंग म्हणतात .
या पोस्ट मध्ये आपण अंडीपुंज , ब्लॅक बॉक्सिंग , ब्रशिंग याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली. काही शंका वाटल्यास नक्की कमेंट करा .... ब्लॉग Subscribe करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला gmail ला नोटिफिकेशन मिळेल माझी नवीन पोस्ट आल्यावर ...... Thank You
भेटु पुढील पोस्ट मध्ये ....
ब्रशिंग हा ब्लॅक बॉक्सिंग करून सर्व रेशीम अळ्या कवचातून बाहेर आल्यानंतर त्यांना त्याच्या कवचापासून वेगळेकरून त्यांना पहिले फिडींग देणे याला ब्रशिंग म्हणतात .
या पोस्ट मध्ये आपण अंडीपुंज , ब्लॅक बॉक्सिंग , ब्रशिंग याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली. काही शंका वाटल्यास नक्की कमेंट करा .... ब्लॉग Subscribe करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला gmail ला नोटिफिकेशन मिळेल माझी नवीन पोस्ट आल्यावर ...... Thank You
भेटु पुढील पोस्ट मध्ये ....
No comments:
Post a Comment