आपल्या देशात रेशीम उद्योग व तुती लागवड क्षेत्रात
सातत्याने वाढ होत आहे. देशात १७,००० मे टनांपेक्षा जास्त रेशीम धाग्याची निर्मिती होते व ६० हजाराहून अधिक
खेड्यात हा उद्योग राबविला जातो. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱ्या या उद्योगाचे
ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही
हा उद्योग अधिक फायदेशीर ठरत आहे. योग्य पाण्याचे नियोजन केले असता इतर पिकांच्या
तुलणेत तुतीला कमी पाणी लागते. व उत्पन्न भरगोस मिळते. रेशिम उद्योगात इतर
पिकांच्या तुलनेत फारच कमी धोका आहे. ज्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध आहे, तिथे
वर्षभर आपण रेशिम कोशांचे उत्पन्न घेऊ शकतो.
आज विदर्भातही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र
वाढले आहे. एकदा तुती च्या रोपांची लागवड केली तर ती पंधरा वर्षापर्यंत आपल्याला
पाला देतात. जरी एखादा वर्ष चुकुन पाऊस कमी पडला तरी तुती ची झाडे जिवंत राहु
शकतात.
यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड शास्त्रीय
दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांना
तुती लागवड, कीटक संगोपन व धागा निर्मितीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो.
इतर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत तो अधिक फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी
संपत्ती सहजपणे ग्रामीण कारागिरांकडे वळली जाते व दिवसेंदिवस आपल्या देशाला
मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतीच्या रेशमास जागतिक बाजारपेठेतील
मागणी लक्षात घेता, दुबार (बायव्होल्टाईन) जातीच्या कोष उत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
तेव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा/तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे
फायदेशीर ठरेल. तुती रेशीम उद्योगाचा यश हे सर्वस्वी तुतीच्या एकरी उत्पादित
होणाऱ्या पानांवर अवलंबून आहे. रेशीम उदोगाच्या यशस्वी उत्पन्नाच्या ३८.२ टक्के
भाग सकस तुती पानांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.
रेशीम उद्योग' या जोड व्यवसायाचे मूळ तूती
लागवडीत दडले आहे हे सर्वश्रृतच आहे. घरच्या गृहिणीलाच नव्हे तर आजी - आजोबा आणि
नातवंडांनाही फावल्या वेळात घरच्या घरी रोजगाराची संधी यातून मिळू शकते. शिवाय
महिन्याकाठी हमखास उत्पन्न आहेच. परंतु त्यासाठी तंत्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना
असणे गरजेचे आहे.
वरील
मुद्यावर विचार केला असता इतर शेती संमाधित उद्योगापेशा रेशिम शेती सरस
ठरणार........च
पुढील पोस्ट मध्ये तुतीच्या विविध जातींविषयी माहिती घेणार आहोत........ धन्यवाद

No comments:
Post a Comment